- September 27, 2022
- No Comment
हडपसर: किरकोळ वादातून रिक्षा चालकाचा निर्घृण खून
हडपसर: सकाळी भांडण झाल्यानंतर रिक्षा चालकाला दारू पार्टीसाठी बोलावून दगडाने आणि लाकडी बांबूने मारहाण करत त्याचा निर्घृण खून केलाय. पुण्यातील हडपसर परिसरातील माळवाडीत हा प्रकार घडला.
सागर राहुल गायकवाड (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा विठ्ठल रेखले (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षदा प्रतीक वाघमारे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर आणि संशयित आरोपी कृष्णा दोघेही रिक्षा चालक आहेत. रविवारी सकाळी त्यांच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्याजवळ दोघांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर सायंकाळी कृष्णा याने सागर याला दारू पार्टीसाठी बोलावले. तिथे आल्यानंतर त्याच्या डोक्यात लाकडी बांबोडे आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हडपसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खून करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.