• September 27, 2022
  • No Comment

चाकण: कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही

चाकण: कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही

चाकण: रस्ता ओलांडत असताना एकास कंटेनरने धडक दिली. त्यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर चाकण येथे घडली.

जयकुमार संतोष राजपूत (वय 24, रा. बोरजाई नगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर हरिभाऊ मोहिते (वय 34, रा. परतवडी, ता. माण, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती (वय अंदाजे 40 वर्ष) रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोड ने चालत जात होते. ते तळेगाव चौकात आले असता आरोपी शंकर मोहिते याने त्याच्या ताब्यातील कंटेनरने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. फिर्यादी हे रुग्णवाहिका चालक असून त्यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Related post

सिबिल स्कोर खराब झालाय? मायनस सिबिल स्कोर सुधारायचा आहे? पहा सविस्तर!

सिबिल स्कोर खराब झालाय? मायनस सिबिल स्कोर सुधारायचा आहे?…

तुम्हाला जर बँक व इतर वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला संबंधित बँक किंवा इतर…
भावानेच केला मोठ्या भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

भावानेच केला मोठ्या भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

लग्न करायला नकार दिल्याने एका भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील मावळ परिसरात…
किरकोळ वादात पिस्तुलातून गोळीबार; कोंढव्यातील घटना

किरकोळ वादात पिस्तुलातून गोळीबार; कोंढव्यातील घटना

पुण्यात पुन्हा एकदा किरकोळ वादातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. २१) मध्यरात्रीच्या सुमारास कोंढव्यातील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *