- September 27, 2022
- No Comment
पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्नात पती व सासरच्यांवर गुन्हा दाखल
निगडी: शारीरिक व मानसीक छळ करत महिलेचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती व त्याच्या कुटुंबावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून निलेश बिप्पीनचंद्र चौधरी (वय 39), दोन महिला आरोपी सर्व राहणार पालघर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने लग्न झाल्यापासून त्यांना शारीरिक व मानसीक त्रास देऊन छळ केला.तसेच घरगुती भांडणात 9 सप्टेंबर 2022 रोजी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. याच्यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत.