- December 23, 2024
- No Comment
भावानेच केला मोठ्या भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना
लग्न करायला नकार दिल्याने एका भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील मावळ परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उदेश पारधी उर्फ उदेश नवाब राजपूत (वय वर्ष 45, कटनी, मध्य प्रदेश) असं खून झालेल्या भावाचं नाव आहे. नट्टू शबस्ता नवाब राजपूत (वय वर्ष 40, कटनी, मध्य प्रदेश) असं आरोपी भावाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उदेश पारधी राजपूत यांच्या मुलीच्या मुलीशी म्हणजेच नातीशी आरोपीच्या मुलाला लग्न करायचं होतं. मात्र उदेश पारधी राजपूत हे या लग्नाला तयार नव्हते. त्यामुळे याच मुद्द्यावरून दोन्ही भावांच्या वाद झाले. हे वाद इतक्या विकोपाला गेले की आरोपीने आपल्याच सख्ख्या भावाचा धारदार शस्त्राने खून केला. भावाच्या छातीवर वार करून हा आरोपी पसार झाला. त्यानंतर उदेश पारधी राजपूत यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.