- September 28, 2022
- No Comment
दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी गजाआड, दरोडा व वाहनचोरी विरोधी गुन्हे शाखा पथक १ ची उल्लेखनीय कामगिरी.
पुणे: दरोडयाच्या गुन्हयातील दोन वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने अटक केले आहे.
तेजस दिलीप साठे (वय २५) , व्यवसाय चालक,रा. लोकमान्य कॉलनी, परमहंसनगर, प्रथमेश बिल्डींग समोर, कोथरूड, पुणे ३८ अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील हद्दीत दरोडा व वाहनचोरी विरोधी प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. २११३/२०२० भादंवि कलम ३९५, सह आर्म अॅक्ट ४ सह २५ व महा पो अधि कलम ३७(१) (३), सह १३५ मधील गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्ष फरार असलेला आरोपी तेजस दिलीप साठे हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी केळगाव, आळंदी, पिंपरी चिंचवड येथे आला आहे. त्याप्रमाणे सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हे कबुल करुन, आरोपीचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकरीता कोथरुड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, मा. श्री श्रीनिवास घाडगे, पोलिस उपआयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे १ व पोनि राजेन्द्र कदम यांचे मार्गदर्शनाखालीसपोनि पाटील, पोहवा गायकवाड, पो ना ताजणे, पोना जाधव, पोना ढगे, पोशि दगडे व मपोशि डोंगरे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.