- September 29, 2022
- No Comment
बनावट सोन्याच्या विटा व डायमंड विकणारा सर्राइत गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा (ग्रामीण) यांची धडाकेबाज कामगिरी
मावळ: स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा (ग्रामिण) यांनी बनावट सोन्याच्या विटा व डायमंड खरे असल्याचे भासवून मोठ्या कंपनीच्या मालकाची फसवणूक करुण १० लाखांचा गंडा घालणाऱ्या, टोळीच्या म्होरक्यास अटक केली आहे.
भिमा गुलशन सोळंकी रा. बडोदा गुजरात सध्या रा. देहूरोड पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत मुंबई येथील राहणारा समद हमीद मकानी (वय 53) धंदा सॉफ्टवेअर कंपनीचा मालक यास काही दिवसापूर्वी आरोपीने ओळख करूण, मी जे.सी.पी.ने कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी जुने घर पाडण्याचे काम करीत असताना मला त्या घरा मध्ये सोन्याच्या विटा व डायमंडची पिशवी मिळून आली आहे. ते मिळालेले सोने विक्री करण्यासाठी मला मदत करा. मला खूप अडचण आहे, मला सध्या १० लाख रुपये दया असे अमीश दाखवून. फीर्यादी यास सोन्याची विट व बनावट डायमंड देवून फसवणूक केली.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथका मार्फत करीत असताना दिनांक 27/09/2022 रोजी गुन्ह्यातील संशयित आरोपी बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपीस वैद्यकीय तपासणी करून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. गु.र.नं.172/2022, भा.द.वि.कलम 406, 417, 419, 420, 504, 506, 34.प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल असुन पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीसस्टेशन करत आहेत. तसेच आणखीन काही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हाहन मा.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जनतेला केले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख साो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गटटे, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. ढोले पाटील सो. यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके व सहा पोलीस निरीक्षक निलेश माने, सपोनि नेताजी गंधारे, सपोनि सचिन रावळ, पो.स.ई. प्रदीप चौधरी, सहा.फौजदार प्रकाश वाघमारे, सहा.फौजदार हनुमंत पासलकर, सहा.फौजदार युवराज बनसोडे, पोहवा राजु मोमीन, पोना बाळासाहेब खडके, पोना शरद जाधवर, पोकॉ धिरज जाधव, पोकॉ प्राण येवले, मपोना मनिषा डमरे, चापोकॉ दगडू विरकर, पोकॉ मच्छिंद्र पानसरे यांनी केली आहे.