• September 29, 2022
  • No Comment

फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, जागा मालकाची तेहत्तीस लाखांची फसवणूक

फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, जागा मालकाची तेहत्तीस  लाखांची फसवणूक

चिंचवड: विकसन करार आणि कुलमुखत्यारपत्र करून जागा डेव्हलपिंगसाठी दिलेल्या जागेत ठरल्याप्रमाणे बांधकाम न करता डेव्हलपरकडून जागा मालकाची 33 लाखांची फसवणूक केली. ही घटना 11 ऑक्टोबर 2015 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत तालेरानगर , चिंचवडगाव येथे घडली.

रमाकांत गोपाळ आसलकर (वय 73, रा. तालेरानगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरके डेव्हलपर्स तर्फे पंकज काशिनाथ पाटील (वय 31, रा. पिंपळे निलख. मूळ रा. नंदुरबार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी मिळून त्यांची चिंचवड येथील जागा आरोपीला विकसनकरार आणि कुलमुखत्यारपत्र करून बांधकामासाठी दिली. आरोपीने ते बांधकाम पूर्ण न करता फिर्यादींना मिळणारे बांधकाम परस्पर विकले. तसेच आर्थिक अडचणींचे कारण सांगून त्यांना रावेत येथील साईटवर फ्लॅट दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 33 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *