- September 30, 2022
- No Comment
कुख्यात गुंड तुषार हंबीरवर खुनी हल्ला करणाऱ्या टोळीवर मोक्का
पुणे: ससून रुग्णालयात उपचार घेत साडेसातशेहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का असलेल्या कुख्यात गुंड तुषार हंबीर याच्यावर वर्चस्व वादातून पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न करून खुनी हल्ला करणाऱ्या प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय २२, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) याच्यासह १२ जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे तर चालू वर्षातील ३४ वी कारवाई आहे. प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे वाघमारे टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी व त्यांच्या पथकाने तयार करून पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी पळवून नेणे, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांनी टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी गुन्हे केले आहेत. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर टोळीवर मोक्का कारवाई केली. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल ९७ टोळ्यांवर कारवाई करून साडेसातशेहून अधिक गुन्हेगारांना कारागृहात टाकले आहे. (२२), सागर हनुमंत ओव्हाळ (२२),
बालाजी हनुमंत ओव्हाळ (२३), सूरज मुक्तार शेख (१९), सागर बाळासाहेब आटोळे (२१), ऋतिक उर्फ बबलू राजू गायकवाड (१९), अनिल अंकुश देवकते (२२), गालीब उर्फ समीर मेहबुब आत्तार (१९), प्रकाश रणछोड़ दिवाकार उर्फ समीर मेहबूब आत्तार (१९), परवेज उर्फ साहील हैदरअली इनामदार (२१), तम्मा उर्फ रोहित सुरेश धोत्रे (रा. वडार वस्ती) आणि साहील शेख उर्फ छोटा साहील अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. साहील शेख हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. प्रतिक उर्फ नोन्या वाघमारे टोळी प्रमुख आहे.