• October 2, 2022
  • No Comment

अग्निशामकदल जवानाने वाचवले आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण

अग्निशामकदल जवानाने वाचवले आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण

सिंहगड: राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला अग्निशमनदलाच्या जवांनानी मोठ्या शिताफीने वाचवले आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये घडला आहे.

मनोज चव्हाण (वय 38 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे आत्महत्या करु पाहणाऱ्या इसमाचे नाव आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला वर्दी मिळाली की, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, श्रद्धा अपार्टमेंट येथे एक इसम राहत्या घरात दार बंद करुन आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार पोलीस तसेच सनसिटी येथील अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहचताच अधिकारी व जवानांनी लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यला सुरुवात केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामधे एका इसमाचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा व लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटर हे उपकरण वापरत पोलिसांच्या परवानगीने तोडून आतमध्ये प्रवेश केला. स्वयंपाक घरामध्ये सदर इसम पंखा व गळ्यामध्ये नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसून आला. तातडीने जवानांनी दोरी तोडत त्याला खाली उतरवून वेळेवर त्याची सुखरुप सुटका करत त्याला जीवदान दिले. या ठिकाणी उपस्थित पोलिसांनीही अग्निशमन दलाला मोठी मदत केली.

ही बचाव मोहीम सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, चालक संतोष चौरे व फायरमन सतीश डाकवे, संजू चव्हाण व मदतनीस कोकरे यांनी केली.

 

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *