• October 13, 2022
  • No Comment

कीरकोळ वादातुन महीलेचा विनयभंग, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कीरकोळ वादातुन महीलेचा विनयभंग, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    चिखली: घरभाडे देण्यावरून घर मालक आणि भाडेकरू या दोन कुटुंबात वाद झाला. ही घटना मोरेवस्ती चिखली येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात विनयभंग, मारहाण आणि दमदाटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    31 वर्षीय भाडेकरू महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार घरमालक, त्यांची पत्नी आणि भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक फिर्यादी राहत असलेल्या खोलीत आले. आमची खोली आजच्या आज खाली करायची, असे म्हणत फिर्यादीस धक्काबुक्की केली. फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

    याच्या परस्पर विरोधात 31 वर्षीय घर मालकिणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाडेकरू दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्यांच्या खोलीत भाड्याने राहणाऱ्या आरोपींकडे भाडे मागण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून पैसे देणार नाही, खोली खाली करणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *