- October 15, 2022
- No Comment
हडपसर साडेसतरानळीत तरुणावर जीवघेणा हल्ला,तरुण गंभीर जखमी
हडपसर: हडपसर साडेसतरा नळी येथे गुन्हेगारीविरोधात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.वाढत्या गुन्हेगारी ही या भागासाठी चिंतेचा विषय बनला असुन अनधिकृत व्यवसायासोबत वादविवादाच्या घटना सर्रास घडु लागल्या आहेत. सामान्य नागरिकांसाठी,महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार झाले असुन पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी अशा सुचना आमदार चेतन तुपे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या भावना मांडल्या होत्या.यावेळी माजी उपसभापती संदीप तुपे,रुपेश तुपे,भाजपाचे भुषण तुपे,सुनिल धुमाळ,डॉ संदिप सोनावणे,अमर तुपे,अमोल तुपे,संतोष तुपे,अभिजीत निकाळजे उपस्थित होते.परंतु काही दिवसातच हाणामारीचे प्रकार पुन्हा जैसे थे.
सिनेमात शोभेल अशा रितीने मारेकऱ्यांनी तोंड फडक्याने झाकत तरुणावर सपासपा वार केले झालेल्या मारहाणीत प्रसिक बनसोडे वय -21 रा.साडेसतरानळी हा जखमी झाला असुन आरोपी यश गरुड यावर कलम 324,34 यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस राहुल गिरमे करत आहे.