• October 14, 2022
  • No Comment

आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केल्याने बँकेचे आंदोलन

आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केल्याने बँकेचे आंदोलन

पिंपरी: आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे.

यामुळे बँकेच्या सुमारे 300 कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात आले असून कर्मचा-यांनी बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.

‘बचाव बचाव बँक बचाव’, ‘वाचवा रे वाचवा बँक वाचवा’, ‘300 कामगारांनी कोणाकडे जायचे’, ‘बँकेचे नुकसान करणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘बँकेचे वाटोळे करणाऱ्यांचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या.

पिंपरी बाजारपेठेचे अर्थकारण अवलंबून असणा-या सेवा विकास सहकारी बँकेचा (आरबीआयने) सोमवारी परवाना रद्द केला. त्यामुळे कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात गेले. खातेदारांचीही चिंता वाढली. सिंधी समाजातील लोकांनी एकत्र येवून 1971 च्या सुमारास सेवा विकास बँकेची स्थापना केली होती. व्यापार सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जात होते. बँकेची व्याप्ती वाढली. 25 शाखा सुरु झाल्या. दरम्यान, नियमांना तिलांजली देवून निर्णय होवू लागले. कागदपत्रांची पूर्तता होत नसतानाही कोट्यवधींची कर्जे मंजूर करण्यात आली. या गैरकारभाराची तक्रार करण्यात आली. चौकशीत विविध 124 प्रकरणात 400 कोटीहून अधिक रुपयांचे कर्जवाटप नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे निष्प्न झाले. याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले.

बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्‍यता नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला. त्यामुळे बँकेतील सुमारे 300 कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात आले असून कर्मचा-यांनी बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.

Related post

2 सिम कार्ड वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! टेलिकॉम कंपन्या घेऊ शकतात मोठा निर्णय

2 सिम कार्ड वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! टेलिकॉम कंपन्या घेऊ…

तुम्ही 2 सिमकार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. खरंतर, अशी माहिती आहे की, फक्त 2G सेवा…
अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर

अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला…

पिंपरी: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडीचे काम सप्टेंबर २०२४…
पाटस येथे कंपनीचा लोगो वापरुन बनावट खताचा साठा अन् विक्री केल्याचा प्रकार उघडकीस; दुकानदारावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल

पाटस येथे कंपनीचा लोगो वापरुन बनावट खताचा साठा अन्…

एका कंपनीच्या नावाचा लोगो वापरुन खताचा साठा आणि विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाटस कुसेगाव रोडलगत असलेल्या श्री. सिध्देश्वर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *