- October 15, 2022
- No Comment
धक्कादायक: मुलीकडून आईला बेदम मारहाण

सांगवी: मुलीने आणि तिच्या पतीने प्रॉपर्टीसाठी आईला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सांगवी येथे घडली.याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार फिर्यादी यांची मुलगी आणि जावई सनी भारत गोंधळे (वय 36, रा. वाकड पोलीस लाईन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा घरी असताना आरोपी मुलगी आणि तिचा पती घरी आले. प्रॉपर्टीच्या कारणावरून फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना आणि मुलाला फ्लॉवर पॉट, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.




