- October 21, 2022
- No Comment
गुंड गजा मारणेला मोक्का कोठडी
पुणे: सराईत गुंड गजानन मारणे याच्या सह दोघांना न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पुणे पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होते. त्यानंतर पोलिसांनी रविवारी गजा मारणे याला सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातील एका फार्म हाऊस वरून अटक केली होती. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
गजानन मारणे यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने कुठे ठेवली आहेत, तसेच त्याने साक्षीदाराचा सुरलीला मुद्देमाल कुठे ठेवला आहे याची चौकशी करण्यासाठी गजानन मारणे आणि मयूर जगदाळे या दोघांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली होती. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत दोघांना 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.