- October 21, 2022
- No Comment
खोटे लग्न करून, अत्याचार प्रकरणातील वकिलाला अखेर अटक
तळेगाव: खोटे लग्न करून, तिच्यावर अत्याचार करून तिला व तिच्या कुटुंबीयांना धमकी प्रकरणी वकील ॲड. श्रेयस श्रीराम पेंडसे याला तळेगाव पोलिसांनी अखेर अटक केली आहे.याप्रकरणी पीडितेने 16 ऑक्टोबर रोजी आरोपी विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात नव्याने तक्रार दिली आहे.
लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून वडगाव मावळ न्यायालयात दावा सुरूहोता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. श्रेयस श्रीराम पेंडसे याला देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करून त्याला अटक करण्यात यावे, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले होते.
पीडितेने आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, राज्य महिला आयोग, बार कौन्सिल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
न्याय मिळाल्यामुळे पीडितेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्षकिशोर आवारे, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व सामाजिक कार्यकर्ते महेश पवार तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जमादवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे नितीन लांडगे यांचे पीडितेच्या परिवारातर्फे आभार मानण्यात आले आहेत. तसेच, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी देण्यात यावी, ही पीडितेच्या परिवारातर्फे पोलीस आयुक्तांना विनंती करण्यात आली आहे.