- October 24, 2022
- No Comment
चुकून ऍक्सेलेरेटर दाबला आणि गाडी उड्डाणपुलावर
पिंपरी: पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर आज शनिवारी सकाळच्या सुमारास अपघात घडला. टाटा सफारी कार पिंपरी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गाडी खाली पडली नसल्याने कुणीही जखमी झालेले नाही.
भाटनगरवरून पिंपरीच्या दिशेला जाणार्या रस्त्यावर एक काळ्या रंगाची सफारी कार उड्डाणपुलाला धडकल्याने हा अपघात झाला.सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. ही गाडी उड्डाणपुलावरून खाली नं पडल्याने मोठा अनर्थ टळला.उड्डाणपूलाखालून ये-जा करणार्या नागरिकांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सफारी कार उड्डाणपुलावर बाजूला पार्क केली होती. कार चालकाला जिम ला जायचे असल्याने त्याने कार चालू करताना चुकून ऍक्सेलेरेटर दाबला गेल्याने वेग वाढला व कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. सिमेंट चे जाड व मोठे कठडे असल्याने कार धडकून अडकली.
उड्डाणपुलाच्या खाली घरे व दुकाने आहेत. कार त्यांच्यावर पडली असती तर मोठी दुर्घटना होऊन माणसे जखमी झाली असती. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. क्रेन बोलावण्यात आले आहे व कारला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.