• October 24, 2022
  • No Comment

हॉटेलच्या भीषण आगीत, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

हॉटेलच्या भीषण आगीत, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली. या आगीत एका सहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

इकरा नईम खान (सहा वर्षे) असे आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळील एका हॉटेलमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी अग्निशामक दलास दिली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक महिला आणि तीन मुलं असल्याची माहिती जवानांना मिळाली. महिला आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. हॉटेलच्या पोटमाळ्यावर अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी मुलीचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी एकीकडे होजच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू केला तर दुसरीकडे स्थानिकांच्या सांगण्यावरून तेथे पोटमाळ्यावर अडकलेल्या एका लहान मुलीला बाहेर काढण्यासाठी बी ए सेट घालून आतमधे प्रवेश करुन त्या मुलीची जखमी अवस्थेत पाच मिनिटात सुटका करुन तातडीने दलाच्या देवदूत या वाहनामधून सुर्या हॉस्पिटल येथे रवाना केले. तसेच इतर कोणी आतमधे अडकले आहे का याची खाञी करुन आग पुर्ण विझवली व तेथे आगीमधे असलेली काही रक्कम व दागिने सदर मुलीच्या आईच्या ताब्यात पोलिसांसमोर दिली अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

सदर ठिकाणी हैद्राबाद बिर्यानी असे हॉटेलचे नाव असून येथे कोळशाच्या सहा शेगडी व तीन सिलेंडर आहेत व गॅस गळती होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी काही प्रमाणात इलेक्ट्रिक शॉक लागत असल्याने महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच सुर्या हॉस्पिटल येथील डॉक्टराच्या माहितीनुसार जखमी मुलगी ईरा नईम खान वय वर्ष 6 हिचा मृत्यू झाला आहे.

अग्निशामक दलाने घटनास्थळावरील तीन सिलेंडर बाहेर काढले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आग नेमकी कशा मुळे लागली हे समजू शकले नाही.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *