• November 5, 2022
  • No Comment

व्हॉटसअप स्टेटसवर मौत का बदला लेंगे असे स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

व्हॉटसअप स्टेटसवर मौत का बदला लेंगे असे स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

    पिंपरी: पवन लष्करे याच्या खूनाचा बदला घेणार म्हणत व्हॉटसअप स्टेटसवर मौत का बदला लेंगे असे स्टेटस ठेवणाऱ्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    आतीश काळे (व 25 रा.पिंपरी) व अर्जून भिमराव वंजारी (वय 24) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाईलवरून त्यांचा मित्र व सराईत गुन्हेगार पवन विष्णू लष्करे याच्या खूनाचा बदला घेण्याच्या आशयाने लष्करे याचा फोटो स्टेटसवर ठेऊन त्याला ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरुर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए, तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे अशा आवाजाचा व्हिडीओ बनवून व्हायरल केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन लष्करे याचा टोळक्यांनी जुन्या भांडणातून धारदार शस्त्राने वार करत खून केला होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *