- November 6, 2022
- No Comment
पोलिस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना बहिर्जी नाईक पुरस्कार, खुनाच्या उकलीत बजावली महत्त्वाची भूमिका
मंत्रालयात नोकरी लावण्याच्या आणि कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्याचा शोध घेऊन त्याला खून करणाऱ्यांना युनीट तीनने अटक केली आहे. संबंधित गुन्ह्यात अतिशय चलाखीने आरोपींचा माग काढल्याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना बर्हिजी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुनील नलावडे असे खून झालेल्याचे आहे. या प्रकरणी महेश शंकरराव धुमाळ (वय 32, रा. पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, पद्मावती वस्ती, ता. शिरूर), शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय 32, रा. मोहितेवाडी, पोस्ट वडगाव, ता. मावळ), शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय 56, रा. गंगानगर, फुरसुंगी), अक्षय पोपट आढाव (वय 22, रा. सिरापूर, ता. पारनेर, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
सुनीलने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेशला मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविले होते. लोन मंजूर करण्यासाठी काहीजणांकडून रक्कम उकळली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून तो फरार होता. सुनील हा वनिता कुर्डेकर हिच्या घरी आल्याची माहिती महेश धुमाळला मिळाली. त्याने फसवणूक झालेल्या इतर साथीदारांना बोलावून सुनीलला बेदम मारहाण करून खून केला. या प्रकरणी आरोपींची माहिती पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली.
युनिट तीनने तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापूर, ता. पारनेरमधून चौघांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, दीपक क्षीरसागर यांनी केली.