- November 6, 2022
- No Comment
तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण करत विनयभंग
देहूरोड: कामासाठी निघालेल्या तरुणीला रस्त्यात अडवून, का बोलत नाही असे म्हणत तरुणाने तिच्या कानशिलात लगावली. तिचा विनयभंग करून शिवीगाळ करत तरुण पळून गेला.
दीपक सूर्यकांत गावडे (रा. साईनगर, गहुंजे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ब्युटीशियन पार्लरच्या कोर्ससाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या मोपेड दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी तरुणीला रस्त्यामध्ये अडवले, तिचा हात धरून बाजूला नेत, तू माझ्याशी का बोलत नाही असे म्हणून थोबाडीत मारली. त्यानंतर आरोपीने तरुणी सोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तरुणी जोरजोरात ओरडल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ करून तिथून पळ काढला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.