- November 6, 2022
- No Comment
पुणे लोहमार्ग पोलीस दलातील शिपाई पदाच्या 124 जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज
पुणे: पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस दलाच्या जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या 124 जागांसाठी येत्या बुधवार (दि.9) पासून अर्ज कऱता येणार आहेत.
यासाठी पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांनी भरती प्रक्रिये बाबत परीपत्रक काढून माहिती दिली आहे, त्यात म्हटल्यानुसार सन 2020 ते 2021 या वर्षातील पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठी इच्छुकांना बुधवार पासून www.policerecruitment2022.mahait.org तसेच www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे अर्ज भरता येणार आहेत.