• November 6, 2022
  • No Comment

किरकोळ वादातून रिक्षाचालकावर चाकुने केले वार

किरकोळ वादातून रिक्षाचालकावर चाकुने केले वार

    येरवडा: मोबाईल चोरताना हटकले म्हणून चोरट्याने रिक्षाचालकावर चाकुने वार केले आहेत. ही घटना येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात घडली.

    या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अक्षय चव्हाण (वय 28 रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार काळ्या रंगाची पल्सर वरून आलेल्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षामधून त्यांचे भाडे सोडण्यासाठी बाणेर कडे जात होते. यावेळी सिग्नलला चौकात थांबले असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने फिर्यादी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. यावेळी रिक्षा खाली उतरून फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपीनेच उलट फिर्यादीशी वाद घालत थांब तुला बघून घेतो म्हणून फिर्यादी जवळ आला. त्याने त्याच्या खिशातील चाकु काढून फिर्यादीच्या पोटावर, खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले. यावरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *