• November 9, 2022
  • No Comment

दरोड्याच्या तयारीत असलेले टोळकी जेरबंद, हिंजवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

दरोड्याच्या तयारीत असलेले टोळकी जेरबंद, हिंजवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    हिंजवडी: पेट्रोल पंपावर शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलिसांनी माण, हिंजवडी येथे केली आहे.

    या कारवाईत पोलिसांनी अनिकेत उर्फ मोन्या अनिल शिंदे (वय 20 रा.मुळशी), अविनाश घनश्याम पवार (वय 30 रा.वाकड), इस्माईल करीम शेख (वय 20 रा.पुनावळे), रामेश्वर साहेबराव तोगरे (वय 20 रा.थेरगाव), सुरज निरंजन पवार (वय 21 रा.वाकड) अशा पाच आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोटावडे माण रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याची पक्की खबर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी गेले. तेथे आरोपींकडे शस्त्र असल्याने पोलिसांनी त्यांच्या गाड्या काही अतरांवर लावल्या व परिसराची पाहणी केली असता पाच संशयीत इसम हे माण येथील बाबुजी बुवा मंदिराच्या आडोश्याला अंधारात दबा धरून बसले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले व मोठ्या शिताफीने आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेतले.

    यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतूस, 1 लोखंडी पालघन, 1 लोखंडी कोयता, मिरची पूड, 4 मोबाईल असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी हे हिंजवडी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते फरार होते. ते आत्तापर्यंत लपून परिसरात वावरत होते.

    यातील अनिकेत शिंदे याच्यावर हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यात दरोडा व खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून हिंजवडीतील दरोड्याच्या गुन्ह्यात इस्माईल करीम शेख व रामेश्वर तोगरे यांनीही त्याला साथ दिली होती. आरोपींवर दरोड्याचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत.

    सदरची कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, गुन्हे पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे व सोन्या बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथक सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अमंलदार बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *