• November 7, 2022
  • No Comment

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ, कंटाळून केली आत्महत्या

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ, कंटाळून केली आत्महत्या

    पुणे: पुण्यातील रेंज हिल परिसरात सासरच्या छास कंटाळून एका पस्तीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. उमा सचिन कुंभार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    याप्रकरणी तिचा पती सचिन कुंभार, सासरे पंढरी कुंभार, सासू सखुबाई कुंभार यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रभाकर सोनवणे (वय 33) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये उमा आणि सचिन कुमार यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर आरोपींनी उमा कुंभार यांना घराच्या बाहेर जाऊ न देता शेजाऱ्यांसोबत बोलण्यास देखील मनाई केली होती. तसेच जेवण व्यवस्थित करता येत नाही म्हणून आरोपी पतीने वेळोवेळी भांडण करून घराच्या बाहेर काढले होते.

    तर इतर आरोपींनी मूलबाळ होत नसल्याने होणाऱ्या वादाला उमाला जबाबदार धरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. अखेरीस हा सर्व त्रास असह्य झाल्याने उमा कुंभार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *