• November 7, 2022
  • No Comment

कात्रज तलावात आढळला पुरुषाचा मृतदेह, ओळख अद्याप पटली नाही

कात्रज तलावात आढळला पुरुषाचा मृतदेह, ओळख अद्याप पटली नाही

    कात्रज: पुण्यातील कात्रज तलावात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

    कात्रज येथे नानासाहेब पेशवे तलाव आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या तलावात सुरक्षारक्षक शेखर दिघे यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची देखील मदत घेण्यात आली. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे 45 इतके आहे.

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    Related post

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…
    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *