- November 9, 2022
- No Comment
कै. तात्याबा सातव फाऊंडेशन व श्री. गणेश तात्याबा सातव यांच्यामार्फत आव्हाळवाडीत मोफत आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेचा मेळावा संपन्न..!
सध्याच्या काळात आधार कार्ड काढणे वा दुरुस्ती करणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. सरकारमान्य आधार केंद्रावर शासकीय दरात आधार कार्ड काढता येते परंतु त्यासाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते. अशातही लांबच्या लांब रांगा असतात. खाजगी केंद्रात तर अवाजवी दर असतात. नागरीकांची हीच अडचण दूर करण्यासाठी व भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा जनतेला थेट लाभ घेता यावा म्हणून श्री. गणेश तात्याबा सातव व सौ अनुष्का गणेश सातव यांच्यातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरीकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शेकडो नागरीकांना मोफत आधार सुविधेचा लाभ घेता आला.
यासोबतच अनेकांनी मोफत सुकन्या योजनेचे खाते उघडून घेतले. आधार कार्डची सेवा मोफत पुरविल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या मेळाव्यासाठी भारतीय डाक विभाग (पूर्व) यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आव्हाळवाडीचे उपसरपंच विक्रम कुटे ,आव्हाळवाडी शिवसेना प्रमुख रमेश आव्हाळे,भाजप नेते गणेश कुटे ,भाजप सरचिटणीस विजय जाचक ,बापु सातव,भैरू(काका)सातव, योगेश सातव ,दत्तात्रय सातव आदी मान्यवर उपस्थित होते.