• November 10, 2022
  • No Comment

लग्नाच्या आमिषाने तीन वर्षे लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    खराडी: लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या तरुणीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात विजय अण्णासाहेब दळवी (रा. करमाळा, जि. सोलापूर) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. 2019 ते 2022 या कालावधीत खराडी बायपास परिसरात घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मुळची नागपूर येथील असून, तिची व विजय हिची पुण्यात ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखविले व तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पण, लग्न करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, तरुणीने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखलकरून तो चंदननगर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *