• November 10, 2022
  • No Comment

स्पा सेंटरवर छापा, दोन पिडीतांची सुटका

स्पा सेंटरवर छापा, दोन पिडीतांची सुटका

    वारजे माळवाडी: वारजे माळवाडी परिसरातील अक्षय कॉलनीमध्ये सुरु असलेल्या ओम स्पावर छापा टाकला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून स्पा मॅनेजरला अटक केली आहे. तर दोन पीडित मुलींची यावेळी सुटका करण्यात आली आहे.

    पोलिसांनी संदीप संतोष तिवारी (वय 23) याला अटक केले असून आकाश प्रकाश साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखालीवेश्या व्यवसाय केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला.त्याने इशारा करताच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता.संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी स्पा मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    सदरची कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *