• November 10, 2022
  • No Comment

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्यावर टाळक्यावर गुन्हा दाखल

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्यावर टाळक्यावर गुन्हा दाखल

    देहु: लग्नाला नकार दिल्यानंतर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझी बदनामी करेन, तुझे लग्न कसे होते तेच बघतो, अशी धमकी देणाऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    23 वर्षीय तरुणीने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत स्वप्नील कल्याण आंधळे (रा. माधवनगर सांगली) याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला लग्नासाठी नकार दिला होता. याच रागातून आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे असे प्रकार सुरु केले. पुढे त्याने फिर्यादीला त्यांचे फोटोचे मॉर्फींग करून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तुझे दुसऱ्याशी लग्न कसे होते तेच बघतो, माझ्याशी संबंध ठेव नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. पाठलाग करून फिर्यादीचा विनयभंग केल्या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *