• November 21, 2022
  • No Comment

पुणे येथील नवले पुलावर रविवारी भीषण अपघात, 13 जण जखमी

पुणे येथील नवले पुलावर रविवारी भीषण अपघात, 13 जण जखमी

पुणे: साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले.

या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


दरम्यान या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली असून, हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले होते.

तर नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा चालक उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, तो सद्या फरार असून काल रात्री झालेल्या अपघातप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताला कारण ठरलेल्या AP 02 TE 5858 ट्रकचा चालक मणीराम छोटेलाल यादव रा. मध्य प्रदेश हा सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

तर या अपघातामध्ये 13 जण जखमी झाले आहेत.
1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे
2) शुभम विलास डांबळे रा. सदर
3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर
तिघेही उपचार कामी नवले हॉस्पिटल येथे
4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे
5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे
मोरया हॉस्पिटल येथे उपचारकामी
6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे
7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे
रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचारकामी
8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज
9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष
10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष
11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर
सर्व उपचारकामी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे
12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे
उपचारकामी जगताप हॉस्पिटल पुणे येथे
13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे उपचारासाठी जगताप हॉस्पिटल पुणे येथे

ब्रीजवरून उतरताना एकानंतर एक अशा 48 वाहनांना धडका देणारा ट्र नेमका कुठे आहे, ट्रकचा चालक कोण आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.रविवारी रात्री झालेल्या या अपघात प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


सातऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकची पासिंग आंध्र प्रदेशची होती. मनीलाल यादव, असे ट्रक चालकाचे नाव असल्याचे पोलिसांच्या माहितीत उघड झाले आहे. हा ट्रक चालक मध्य प्रदेशचा आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नवले ब्रीज अपघात, आतापर्यंत काय काय?

रविवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

पुण्यातील मुंबई- बंगळुरू हायवेवर नवले ब्रीजवर ही घटना घडली.

आंध्र प्रदेशची पासिंग असलेला ट्रक रविरात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता.

नवले ब्रीज परिसरात दरी पूल ओलांडल्यानंतर ट्रकचं नियंत्रण सुटलं. ब्रीजच्या उतारावरून एकानंतर एक असंख्य वाहनांना धडका देत ट्रक पुढे निघाला.

या घटनेत जवळपास 48 वाहनांना मोठं नुकसान झालं तर 10 जण जखमी झाले.

घटना घडताच काही वेळातच अपघात स्थळी बचावकार्य सुरु झाले.

ट्रॅफिक जाम असल्यामुळे अनेक वाहने एकमेकांना खेटून उभी होती. यामुळे अनेक वाहनांमध्ये लोक आणि चालक अडकून पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांसमोर अपघातग्रस्त वाहनांतून चालकांना बाहेर काढण्याचं आव्हान होतं.

सोमवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सारण्याचं काम सुरु होतं.

सध्या नवले ब्रीजवरील ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून आता हा ब्रीज वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.

जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका का झाला, यासंबंधी महत्त्वाची बैठक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे आज सोमवारी बोलावण्यात आली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *