- November 21, 2022
- No Comment
मार्केटयार्ड गोळीबारातील दोन आरोपी शस्त्रासह गजाआड
मार्केटयार्ड: पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात भर दिवसा गोळीबार करून लुटणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे. ही करवाई पुणे आयु्क्तालयाच्या गुन्हे शाखा युनीट तीन यांनी केली आहे.
या आधीही पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. संतोष बाळू पवार (वय 23 रा. पानशेत) व साई राजेंद्र कुंभार (वय 19 रा.खानापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनीट तीनचे पोलीस अमंलदार राकेश टेकावडे यांना बातमी मिळाली की पुण्यात गंगाधाम येथे दोघे संशयीत रित्या थांबले असून त्यांच्याकडे शस्त्र आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपी व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांना 80 हजार रुपयांच्या दोन गावडी बनावटीच्या बंदूक जप्त केल्या.
पोलिसांनी आरोपींकडे अधीक तपास केला असता संतोष याने या बंदूका जळगाव येथून आणल्या व त्या त्याने त्याचा साथीदार साई याच्याकडे ठेवण्यास दिल्या. साई याने त्यातील एक बंदूक ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलाला दिले. त्य़ाचाच वापर करत त्यामुलाने मार्केडयार्ड येथे गोळीबर करत लूट केली. याच बंदूकाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी गंगाधाम येथे आले होते. मात्र, त्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावरून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मार्केट यार्ड पोलीस याचा पुढील तपास करत आहे.
मार्केटयार्ड सारख्य़ा गर्दीच्या ठिकाणी 12 नोव्हेंबर रोजी गणराज मार्केटमधील पी.एम.कुरीअर ऑफीसमध्ये पाच जण घुसले. त्यांनी हातात कोयता व पिस्टल रोखून धरले होते. यावेळी त्यांनी दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार करत उपस्थितांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमधून 27 लाख 45 हजार रुपये रोख चोरून नेले होते.