• November 21, 2022
  • No Comment

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारे दोन टाळकी जेरबंद

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारे दोन टाळकी जेरबंद

     

    दिघी: कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन जनावरांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई बोपखेल येथे करण्यात आली.

    अश्रफ शौकत खान (रा. येरवडा), दिलीप सुरेश घुले (रा. बोपखेल) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपाची नावे आहेत. याप्रकरणी मानद पशुकल्याण अधिकारी निलेश विजय चासकर (वय 33) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या टेम्पोत दोन बैल कत्तलीसाठी भरले. त्यांना टेम्पोमध्ये चारा पाण्याची आरोपींनी व्यवस्था केली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुणे-आळंदी रोडवर बोपखेल येथे टेम्पो अडवून कारवाई केली. साडेतीन लाखांचा टेम्पो आणि सहा हजारांचे दोन बैल पोलिसांनी जप्त केले आहेत. दोघांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *