• November 21, 2022
  • No Comment

मेट्रोमोनीयल फ्रॉड! लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

मेट्रोमोनीयल फ्रॉड! लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

     

    पुणे: मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मारुंजी येथे घडला.

    याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुशल आलोक जौहरी (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झाली. आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच त्याने फिर्यादींसोबत कुंकवाचा देखील कार्यक्रम केला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *