• November 21, 2022
  • No Comment

नातेवाईकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

नातेवाईकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

     

    चिखली: घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत तरुणाने नातेवाईक महिलेवर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार जाधववाडी चिखली येथे घडला.

    याप्रकरणी १९ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीच्या नातेवाईक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती, दीर, सासू हे शनिवारी सकाळी कामावर गेले. त्यानंतर फिर्यादी महिला आणि त्यांची जाऊ अशा दोघी घरी होत्या. फिर्यादीची जाऊ देखील बाहेर गेल्यानंतर फिर्यादी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन नातेवाईक तरुणाने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने त्यास विरोध केला असता घडलेला प्रकार कोणास सांगितला तर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *