- November 21, 2022
- No Comment
मेफेड्रॉन आणि चरसची विक्री करणारे दोन सर्राइत गजाआड
सिंहगड: पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थाची (मेफेड्रॉन आणि चरस) विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
अनिकेत जनार्दन दांडेकर (वय 20) आणि आकाश महिंद्र ठाकर (वय 22) अशी अटक करण्यात या दोघांची नावे आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील अखिल ओमकार मित्र गणेश मंडळ गणेश मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना वरील आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता सुमारे दोन लाख रुपयाचं मेफेड्रॉन आणि चरस सापडले. या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
