• November 21, 2022
  • No Comment

घरमालकिणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भाडेकरुवर गुन्हा दाखल

घरमालकिणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भाडेकरुवर गुन्हा दाखल

     

    धनकवडी: घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीने घरमालकिणीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील धनकवडी परिसरातील तळजाई पठार परिसरात हा सर्व प्रकार घडला.

    याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत हनुमंत लोखंडे (वय 45) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 43 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा भाडेकरू आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. फिर्यादी महिलेच्या पतीच्या निधनानंतर म्हणजेच 2019 पासून आरोपीने भाडे न देता फिर्यादी त्यांच्यावर वाईट नजर ठेवली. फिर्यादी या भाडे मागण्यासाठी गेल्या असता बोलायचे आहे असे म्हणून त्यांना टेरेसवर नेले.

    टेरेसवर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला ओढून घेतले आणि मी तुला सांभाळतो असे म्हणून त्यांच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगताच शिवीगाळ करत फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *