• November 21, 2022
  • No Comment

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     

    निगडी: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत शारीरिक संबंधास नकार दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार रावेत येथे घडला.

    याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनोद विजय मिस्त्री (रा. सोलापूर) याच्यावर गुन्ह दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा विश्वास संपादन करत त्याचा मित्र ओंकार (पूर्णनाव माहित नाही) यांच्या रुमवर नेऊन आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच यापुढे शारीरिक संबंधाना नकार दिला तर पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *