• November 21, 2022
  • No Comment

दोन आरोपी मोठ्या शस्त्रसाठयासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

दोन आरोपी मोठ्या शस्त्रसाठयासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

     

    स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत 3 गावठी पिस्टल, 6 मॅगझीनसह तब्बल 30 जिवंत काडतुसे जप्त करीत 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम काळया रंगाचे बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याचे समजले सदर बातमीची खात्री करून घेण्यासाठी त्याठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील २ इसमांना ताब्यात घेतले.

    या दोघांची अंगझडती घेतली असता आकाश याचे कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस 2 लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले तसेच त्याचे पॅन्टच्या खिशात 2 मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश याचे याचे कंबरेला 1 गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले. त्याचे पॅन्ट च्या खिशात 1 जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली. सदरील दोन्ही ईसमांकडून 3 गावठी पिस्टल आणि 3 मॅकझीन, प्रत्येकी 5 जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी 5 जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली

    सदरीची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो श्री अंकित गोयल सो अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे सो,पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,स पो नी नेताजी गंधारे,पो स ई शिवाजी ननवरे, पो स ई गणेश जगदाळे, पो हवा विक्रमसिंह तापकीर, पो हवा विजय कांचन, पो ना अमोल शेडगे, पो ना बाळासाहेब खडके, पो शि धिरज जाधव, पो शि निलेश सुपेकर, पो शि दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *