• November 25, 2022
  • No Comment

मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार असणारे तीन गुंड जेरबंद

मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार असणारे तीन गुंड जेरबंद

     

    पुणे: मोक्क्याच्या गुन्ह्यात (Pune Crime) मागील एक वर्षापासून फरार असणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. चंदु गायकवाड, करण काळे, गणेश नाडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी फरार असून त्यांच्यावर मोक्याअतंर्गत कारवाई केल्याने पोलीस त्यांच्या मागावर होतीच. यावेळी पोलिसांना चंद्रकांत उर्फ चंदू हा भारती विद्यापीठ येथे चोरून उपचारासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर यांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

    आरोपीचे दोन साथीदार हे शेवाळे वस्ती येथे पत्र्याच्या रूममध्ये लपून बसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जाऊन करण विठ्ठल काळे (वय 25 रा. बिबेवाडी) व गणेश जयजयकार नाडे (वय 20 रा, बिबेवाडी) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *