• November 25, 2022
  • No Comment

तोतया पोलीसाने पाच लाखांना घातला गंडा, एकाला अटक

तोतया पोलीसाने पाच लाखांना घातला गंडा, एकाला अटक

     

    चंदननगर: पोलीस असल्याची बतावणीकरून तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, असे खोटे सांगून तोतयाने एका व्यक्तीकडून तब्बल पाच लाख रुपये उकळले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तोतयाला अटक करण्यात आली आहे.

    मधुकर विलास सापळे (वय 32, रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आह. अजय गुलाबराव भोसले (वय 32) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला एप्रिल ते जून या कालावधीत पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी विरोधात वेगवेगळ्या गुन्हा कोर्टात केसेस सुरू आहेत आणि आणखी गुन्हे दाखल करण्याची खोटी भीती दाखवली. तसेच फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 5 हजार रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *