• November 25, 2022
  • No Comment

व्यवसायात पार्टनर असलेल्या महिलेचा लैंगिक छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

व्यवसायात पार्टनर असलेल्या महिलेचा लैंगिक छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     

    कोंढवा: हॉटेल व्यवसायात पार्टनर म्हणून असलेल्या महिलेचा लैंगिक छळ करून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 45 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी निखिल प्रकाश भगत (रा.सनश्री सोसायटी, एनआयबीएम, कोंढवा) याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत आरोपीने फिर्यादीला हॉटेल व्यवसायात भागीदार म्हणून काम करण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी सोबत अश्लील वर्तन केले. नोव्हेंबर 2020 मध्ये आरोपींनी फिर्यादीला तिचे पैसे देण्याच्या निमित्ताने न्यानो कारमधून वानवडी येथील एके ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर रिवाल्वर सारख्या वस्तूचा धाक दाखवून त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या सर्व प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड असून व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *