- November 28, 2022
- No Comment
पुणे शहर पोलीस आयुक्तालय तर्फे दि. २६/११/२००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शाहिदांना मानवंदना.
दि.२६.११.२०२२ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय व सेवा मित्र मंडळ यांचे संयुक्त
विद्यमाने दि.२६.११.२००८ रोजी मुंबई येथे शहिदांना मानवंदना व शालेय मुलांचा चित्रकला व खाऊ
वाटपाचा कार्यक्रम सारसबाग स्वारगेट पुणे येथे पार पडला आहे. सदर कार्यक्रमास मा. पोलीस
आयुक्त पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. सह आयुक्त पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस
आयुक्त,गुन्हे पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ पुणे श्रीमती स्मार्तना
पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ पुणे श्री संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५
पुणे श्री.विक्रांत देशमुख, श्री पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा श्री श्रीनिवास
घाडगे, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे श्री. आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट
विभाग पुणे,श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे श्री. आर. एन. राजे,
तसेच आयुक्तालयातील सर्व पोलीस निरीक्षक व अंमलदार हे हजर होते.
मा.पोलीस आयुक्त पुणे
शहर, श्री अमिताभ गुप्ता यांनी व इतर अधिकारी व अंमलदार यांनी शहिदांना मानवंदना देऊन
पोलीस मुख्यालया तर्फे शहिदांना सलामी देण्यात आली आहे. नमुद कार्यक्रमा वेळी सेवा मित्र मंडळ
पुणे अध्यक्ष शिरीष मोहिते व पदाधिकारी व नागरीक हजर होते.
पुणे शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील
शालेय विद्यार्थी यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सदरच्या चित्रकला स्पर्धेला सुमारे
१०,००० वेगवेगळ्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यावेळी शालेय
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर चित्र काढण्यास सांगुन त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिस वितरण करुन
खाऊ वाटप करण्यात आले आहे.
सदरचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्तालय व सेवा मित्र मंडळ यांचेवतीने आयोजित
करण्यात आला होता.