• November 28, 2022
  • No Comment

विमानतळ पोलीसांची धडक कारवाई एका इसमा कडुन पकडले ०१ पिस्टल ०२ जिवंत राऊंड

विमानतळ पोलीसांची धडक कारवाई एका इसमा कडुन पकडले ०१ पिस्टल ०२ जिवंत राऊंड

विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास
सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री.मंगेश जगताप पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद्र ढावरे व तपास पथकातील
स्टाफ असे पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पो. अमंलदार गिरिष नाणेकर व सचिन
जाधव यांना खाजगी बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की खुळेवाडी कॉर्नर पुणे नगर रोड पुणे येथे
मोकळया मैदानात एक इसम थांबलेला असुन त्याचेकडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट
पाहत आहे.


सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. विलास सोंडे,
यांना कळविली असता, त्यांनी बातमीची खात्री करुन शहानिशा करून कारवाई करा असे तोंडी आदेश
दिले. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस
उप निरीक्षक ढावरे व स्टाफ यांनी सापळा लावुन इसम नामे संतोष शंकर गुंजाळ वय २६ वर्ष रा.स.नं.
१६५, दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर पुणे यास पकडले असता त्याचेकडे ५०,२००/- रुपये
किंमतीचे ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत राऊंड मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आलेले
आहेत.


सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४५०/२०२२ शस्त्र
अधिनियम १९५९ कलम ३, २५व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणेगुन्हा दाखल आहे.
तसेच सदरचा पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास सहा पोलीस फौजदार
अविनाश शेवाळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. सह आयुक्त, पुणे शहर
श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण मा.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर श्री. शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे
शहर,सौ.आरती बनसोडे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर
श्री.विलास सोंडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे श्री मंगेश जगताप यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस अमंलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम,
सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, संजय आसवले
यांचे पथकाने केली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *