- November 27, 2022
- No Comment
लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवून अल्पवयीन मुलीचा खून

आंबेगाव: पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एका तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर या मुलीने लग्नाचा तगादा लावताच तिचा खून केला. या तरुणांना उंदीर मारण्याचे औषध या तरुणीला खाण्यास भाग पाडलं आणि तिचा खून केला, असं मयत मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
रोहिदास जीवन कारोटे (वय 21) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत मुलीच्या आईने या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील कोंढावळे गावात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहिदास याने दोन वर्षापासून मयत मुलीला लग्नाचे अमिष दाखवले आणि शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर मुलीने लग्न करण्याचा तगादा लावल्याने आरोपीने तू मला आवडत नसल्याने आपले लग्न होणार नाही असे सांगितले. तरीही मुलगी त्याच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावत राहिली. यामुळे तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आरोपीने तिला पेढ्यातून उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातले आणि तिचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.





