- November 28, 2022
- No Comment
प्रेम प्रकरणातील संशयावरुन खुन्याचा प्रयत्न करणा-या सराईत आरोपींना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक
यातील फिर्यादी, वय १८ वर्ष, धंदा काही नाही रा. धनकवडी पुणे
यांना प्रेम प्रकरणाचे संशयावरुन सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार १) ओम समाधान
कसबे वय १९ वर्षे, मुळ रा. खंडाळे चौक तळजाई वसाहत सध्या रा. कार्पोरेशन बिल्डींग पाहीला मजला
फ्लॅट नं. १०१ शंकर महाराज वसाहत चव्हाण नगर धनकवडी पुणे याने एका विधीसघंर्षीत बालकाचे
मदतीने कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार फिर्यादी यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २३८ / २०२२ भा.द.वि.क. ३०७,३२३,५०४,३४ महा.पो.
अधि.क.३७ (१) सह १३५, आर्म अॅक्ट क. ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासुन
आरोपी ओम कसबे व विधीसंघर्ष बालक फरारी झाले होते.
दाखल गुन्हयाचा तपास मा. श्री. सावळाराम साळगांवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स. नगर
पोलीस स्टेशन पुणे व मा. श्री. प्रकाश पासलकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) स. नगर पोलीस स्टेशन यांचे
मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन
मुलाणी व तपास पथकातील अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक
यांना आरोपी ओम कसबे हा त्याचे बाल साथीदारासह तिरुपतीनगर मधील गौतम खंडाळे यांचे गोडावुन
जवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. लागलीच त्यांना तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी
सदर ठिकाणी जावुन ताब्यात घेवन तपास करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने ओम कसबे यास वरील
गुन्हयात अटक करण्यात आली आहे. ओम कसबे याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेला धारदार कोयता व
पळुन जाण्यासाठी वापरलेली गाडी असा माल जप्त केला आहे.
दाखल गुन्हयात निष्पन्न झालेला आरोपी नामे ओम कसबे हा रेकॉर्डवरील हे सराईत
गुन्हेगार असुन त्याने यापुर्वीही अशा प्रकारचे मारामारीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री.राजेंद्र डहाळे
पोलीस उपायुक्त, परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती सुषमा
चव्हाण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रकाश पासलकर यांचे
मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, हसन
मुलाणी, पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर
सुतकर, सागर कुंभार, राजेंद्र नलावडे यांनी केली आहे.