- November 28, 2022
- No Comment
भारती विद्यापीठ खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अटक
मयत इसम नामे निखील ऊर्फे संकेत चंद्रशेखर अनभुले, वय ३२ वर्षे, रा. आई साहेब बिल्डींग,
स्वामीसदन, सर्व्हे नंबर ३३/०४, आंबेगाव बु, पुणे यांचे आरोपी नामे विशाल अमराळे, लहु माने, व शुभम
मोरे यांनी पैश्या करीता अपहरण करुन त्यास कोंडुन ठेवुन, जबर मारहाण करुन जिवे ठार मारले म्हणुन
फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३०२,३६४,३८८,३४१, ३२३,
३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी विशाल अमराळे, लहु माने, व शुभम मोरे यांचा शोध घेणेबाबत
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी तपास पथकाचे अधिकारी अमोल रसाळ, सहाय्यक पोलीस
निरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस उप निरीक्षक, व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन योग्य ते मार्गदर्शन
केले. मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार
हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे व अभिजीत जाधव यांना नमुद गुन्हयातील आरोपी
विशाल अमराळे हा आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ कडुन हायवेकडे जाणा-या रोडवर थांबला
असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन
आरोपी विशाल चंद्रकांत अमराळे, वय ३५ वर्षे, रा. पुण्यनगरी सोसायटी, डी बिल्डींग, फ्लॅट नंबर ५,
बिबवेवाडी, पुणे यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस
आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस
स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक,
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार राहुल तांबे,
अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, रविंद्र भोरडे, राहुल शेडगे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अवधुत
जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, मितेश चोरमोले,
अभिनय चौधरी, यांच्या पथकाने केली आहे.