• November 30, 2022
  • No Comment

श्रद्धाला मारायचा कट आधीच रचलेला, अजिबात पश्चाताप नाही”; पॉलिग्राफ चाचणीत आफताबनं केले धक्कादायक खुलासे

श्रद्धाला मारायचा कट आधीच रचलेला, अजिबात पश्चाताप नाही”; पॉलिग्राफ चाचणीत आफताबनं केले धक्कादायक खुलासे

    श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफएसएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबाने पॉलिग्राफ चाचणीत आपला गुन्हा कबूल केला आहे. पॉलीग्राफ चाचणीच्या वेळीही आफताबच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप दिसत नव्हता,
    पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आफताबने श्रद्धाची हत्या केली असल्याची बाब कबूल केली. खूप आधीच श्रद्धाची हत्या करायची होती, असेही त्याने म्हटले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले असल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाशिवाय, इतर काही मुलींसोबत आपले संबंध होते याची कबुलीदेखील आफताबने दिली.


    पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आफताबने श्रद्धाची हत्या केली असल्याची बाब कबूल केली. खूप आधीच श्रद्धाची हत्या करायची होती, असेही त्याने म्हटले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले असल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाशिवाय, इतर काही मुलींसोबत आपले संबंध होते याची कबुलीदेखील आफताबने दिली.

    श्रद्धा मे महिन्यातच आफताबसोबत करणार होती ब्रेकअप; तपासात नवी माहिती समोर
    आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये कोणता खुलासा?, पोलिसांमुळे आफताबला संधी?
    आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये कोणता खुलासा?, पोलिसांमुळे आफताबला संधी? श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर संतप्त जमावाकडून तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न; पोलिसानं गन रोखली अन्…श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर संतप्त जमावाकडून तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न; पोलिसानं गन रोखली अन्…
    दिल्लीत पुन्हा प्रेमाचे 22 तुकडे, आधी श्रध्दाचे आता अंजनचे : दिल्लीत पुन्हा प्रेमाचे 22 तुकडे, आधी श्रध्दाचे आता अंजनचे : श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न : श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न :

    पॉलीग्राफ चाचणी करणाऱ्या तज्ज्ञांनी आफताबला काही प्रश्ने विचारली. या प्रश्नांना आफताबने अशा प्रकारे उत्तरे दिली.
    प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केली का?

    आफताब- हो

    प्रश्न- 18 मे रोजी हत्या झाली होती का?

    आफताब- हो

    प्रश्न- तुम्ही शरीराचे अवयव जंगलात फेकले का?

    आफताब- हो

    प्रश्न- तुम्ही श्रद्धाला मारण्याचा कट आधीच केला होता का?

    आफताब- हो

    प्रश्न- तुम्हाला श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होतोय का?

    आफताब – नाही

    प्रश्न- श्रद्धाला मारण्याच्या उद्देशाने तुम्ही तिला दिल्लीत आणले होते का?

    आफताब- हो

    प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केल्याचे तुमच्या घरच्यांना माहीत होते का?

    आफताब- नाही

    आफताबने या दरम्यान, पोलिसांना हत्याकांडाशी निगडीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर, तज्ज्ञांकडून पॉलिग्राफ चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत आहे. हत्याकांडाशी निगडित अनेक गोष्टीचा उलगडा होण्यास या चाचणीची पोलिसांना मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

    पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी, एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. पॉलिग्राफ चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.

    दरम्यान, श्रद्धा हत्याकांडाच्या तपासाच्या अनुषंगाने दिल्ली पोलिसांचे एक पथक वसईमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी आफताब आणि श्रद्धाचे नातेवाईक, परिचीत, मित्र-मैत्रिणींची चौकशी केली होती.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *