• November 30, 2022
  • No Comment

50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार! व्हिडीओही शूट केला

50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार! व्हिडीओही शूट केला

    पुणे : पुणे जिल्ह्यातील एका 50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पेशाने सीए असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अनिरुद्ध सतीश शेठ असं आहे. ही व्यक्ती कांचनगंगा होम्, डहाणूकर कॉलनी, कोथरुड येथे राहायला असून कोथरुड येथे त्याचं ऑफिसही आहे. ऑफिसात सोबत काम करणाऱ्या महिलेवरच अनिरुद्ध याने बलात्कार केल्याचा आरोप केलाय. सध्या कोथरुड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


    2019 ते 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेनं पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी सीए अनिरुद्ध शेठ याला अटक केलीय.

    मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यानं फिर्यादी महिलेला भुगाव इथं नेलं होतं. फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याच्याने पीडितेला अनिरुद्ध भुगाव येथील फ्लॅठवर गेला होता. त्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचं औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवले होते. या घटनेचा व्हिडीओही त्याने रेकॉर्ड केला होता.

    संपातजनक बाब म्हणजे सदर घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो व्हायरल करण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यानंतर फिर्यादीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई, पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलात आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलीत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *