- November 30, 2022
- No Comment
पावणे 10 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन यांना अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
याबात अपर विशेष लेखापरिक्षक जे एस गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार लेखा परिक्षण करण्यात आले.
त्यात लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेतच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी
संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरीता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा
दुरुपयोग करुन घेतला.
त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे संस्था अडचणीत येणार असून
ही बाब निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असताना सुद्धा कळविली नाही. तसेच नियंत्रक वैशाली पवार व
अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे.
दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे,
बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे
अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन ९ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परिक्षणातून
आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंदलकर
तपास करीत आहेत.