• November 30, 2022
  • No Comment

लोणीकाळभोर पोलीस ठाणे परिसरात खंडणी मागून दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ८७ वी स्थानबध्दतेची कारवाई

लोणीकाळभोर पोलीस ठाणे परिसरात खंडणी मागून दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ८७ वी स्थानबध्दतेची कारवाई

    लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे मोन्या
    उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ वय २४ वर्षे रा. नवीन कॅनॉल जवळ, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी,
    लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह
    लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह
    खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर
    स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०५ गुन्हे दाखल आहेत.


    त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली
    होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार
    करणेस धजावत नव्हते.
    प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
    शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ०१
    वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. दत्तात्रय
    चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस
    निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.


    मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर
    कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ८७ गुन्हेगारांना एमपीडीए
    कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी
    प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *